ठाणे | ठाणे येथे एका मोठ्या मॉलमधील रेस्टॉरंटमधून कुंटणखान्यासाठी महिला पुरवणाऱ्या तरुणींसह तिच्या रिक्षाचालक साथीदाराला ठाणे पोलिसानी शनिवारी रात्री ( ता. १६) अटक केली. हि तरुणी मालाड येथील असल्याची महिती मिळाली आहे. यात तिच्यासोबत सामील असणाऱ्या एका रिक्षाचालकालाही अटक करण्यात आली आहे . पैश्यांचे प्रलोभन दाखवून देहविक्रीसाठी भाग पडलेल्या तीन महिलांची सुटका करण्यात आली आहे .
गरीब व गरजू महिलांना हेरून ही तरुणी त्यांना पैश्यांचे प्रलोभन दाखवत देहविक्रीसाठी त्यांना भाग पाडते असे, अशी माहिती ठाणे अनैतिक मानवी वाहतूक शाखेच्या पथकाला मिळाली होती , त्यानुसार पोलिसानी कापूरबावडी परिसरातील लेकसिटी मॉलमधील एका रेस्टॉरंटमध्ये सापाला रचला होता . ह्यावेळी संबंधित तरुणी व तिचा रिक्षाचालक साथीदार तरुणींना देहविक्रीसाठी ग्राहकांबरोबर पाठवत असल्याचे निदर्शनास आले .
ठाणे पोलिसानी अश्या प्रलोभन देणाऱ्या व्यक्तीं पासून सावध राहण्याचे आवाहन महिलांना केले आहे , तसेच प्रलोभन देताना कोणी आढळल्यास त्याची तात्काळ माहिती पोलिसाना द्यावी असे ठाणे अनैतिक मानवी वाहतूक शाखेच्या पथकाने सांगितले आहे.