आता सीआरपीएफ जवानांनाही श्रीनगरहून दिल्लीला जाण्यासाठी विमानसेवा देण्यात येणार आहे. पुलवामा हल्ल्यानंतर केंद्रीय गृहमंत्रालयाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. दिल्ली-श्रीनगर, श्रीनगर-दिल्ली, जम्मू-श्रीनगर आणि श्रीनगर-जम्मू प्रवासासाठी ही सेवा असेल. सीआरपीएफच्या 7,80,000 जवानांना याचा फायदा होईल. सीआरपीएफचे जवान सुट्टीवर जातान देखील या सेवेचा फायदा मिळणार आहे.
आत्तापर्यंत फक्त लष्करी जवानांसाठीच ही सेवा होती. सीआरपीएफच्या जवानांना बसने प्रवास करावा लागत होता. त्यांसाठी प्रचंड सुरक्षाव्यवस्था द्यावी लागत होती आणि जोखीमही प्रचंड होती. त्यातच पुलवामा घटनेनंतर या जवानांना विमानसेवा नसल्याबद्दल प्रचंड टीका झाली होती. त्यामुळे केंद्रीय गृहमंत्रालयाने तातडीने हा निर्णय घेतला आहे.