भारतीय वंश असलेल्या कॅनेडाच्या चित्रपट दिग्दर्शक दिपा मेहता यांना अकॅडेमी ऑफ कॅनेडियन सिनेमा अँड टेलिव्हीजन या संघटनेकडून जीवनगौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. दिपा मेहता या त्यांनी दिग्दर्शित केलेल्या “फायर”, “अर्थ” आणि “वॉटर” चित्रपटांसाठी ओळखल्या जातात.
कॅनेडियन स्क्रीन अवार्ड दरवर्षी अकॅडेमी ऑफ कॅनेडियन सिनेमा अँड टेलिव्हीजन या संघटनेकडून कॅनेडियाई चित्रपट, इंग्रजी भाषेमधील मालिका आणि डिजिटल मिडीया प्रॉडक्शन या क्षेत्रांमध्ये उत्कृष्टत कामगिरींचा गौरव करण्याकरिता दिले जातात.