भारताचे राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांनी वर्ष 2014, वर्ष 2015 आणि वर्ष 2016 साठी ‘सांस्कृतिक सलोख्यासाठीच्या टागोर पुरस्कार’चे वाटप केले.
१) वर्ष 2014 साठी – राजकुमार सिंघजित सिंग (मणीपूरी नर्तक)
२) वर्ष 2015 साठी – बांग्लादेशची ‘छायानट’ ही सांस्कृतिक संस्था
३) वर्ष 2016 साठी – राम वाणजी सुतार (शिल्पकार)
दरवर्षी दिला जाणारा ‘सांस्कृतिक सलोख्यासाठीचा टागोर पुरस्कार’ (Tagore Award for Cultural Harmony) भारत सरकारतर्फे 2012 सालापासून देण्याचे सुरू करण्यात आले. रविंद्रनाथ टागोर यांच्या कार्यांचा तसेच बांग्ला संस्कृतीसंबंधी कलेचा प्रचार करणार्या व्यक्तीला वा संस्थेला हा पुरस्कार दिला जातो. एक कोटी रुपये रोख रक्कम, सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र तसेच एक पारंपारिक हस्तकलेची वस्तू असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.