पुलवामा दहशतवादी हल्ल्याचे पडसाद देशभर उमटत आहे. यामध्ये विविध संघटनांकडून देशभरातील काश्मिरी विद्यार्थ्यांना लक्ष्य केले जात आहे. त्यामुळे त्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर झाला आहे. सर्वोच्च न्यायालयानेही याची दखल घेत महाराष्ट्रासह 11 राज्यांना नोटिसा बजावल्या आहेत. काश्मिरी विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक पावले उचलावीत, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत.
केंद्र सरकारसह महाराष्ट्र, पंजाब, उत्तर प्रदेश, बिहार, जम्मू-काश्मीर, हरयाणा, मेघालय, पश्चिम बंगाल, छत्तीसगड, उत्तराखंड आणि दिल्ली या राज्यांना न्यायलयाने नोटिसा पाठवल्या आहेत.
काश्मिरी विद्यार्थ्यांना सुरक्षा देण्याच्या मागणीची याचिका न्यायालयात दाखल करण्यात आली होती. त्यावरील सुनावणीदरम्यान, या राज्यांना नोटिसा बजावून सुरक्षा पुरवण्याचे आदेश देण्यात आले आहे. दरम्यान, ऑफिसरकडे काश्मिरी विद्यार्थी तक्रार दाखल करू शकतात, असेही न्यायालयाने म्हटले आहे.