दक्षिण कोरियाच्या दौऱ्यावर असलेल्या पंतप्रधान मोदींनी आज द. कोरियाच्या शहिदांना श्रद्धांजली वाहिली. त्यानंतर त्यांनी द. कोरियाचे राष्ट्राध्यक्ष मून-जे-इन यांची भेट घेतली. या भेटीवेळी मोदी यांना सेऊल शांती पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. सेऊल शांती पुरस्कार 1990 पासून देण्यात येत आहे. याआधी संयुक्त राष्ट्राचे माजी महासचिव कोफी अन्नान, जर्मन चान्सलर एंजेला मर्केल यांना या पुरस्काराने गौरवण्यात आले आहे.
या पुरस्कारासाठी जगभरातून 1300 नावांच्या शिफारसी आल्या होत्या. पुरस्कार निवड समितीने यामधून 150 उमेदवार निवडले गेले. त्यामधून मोदींचे नाव ‘द परफेक्ट कॅन्डिडेट फॉर द 2018 सेऊल पीस प्राईज’ निवडले गेले.