16 फेब्रुवारी 2019 रोजी भारतने पाकिस्तानमधून आयात होणाऱ्या सर्व वस्तूंवर सीमाशुल्क तत्काळ प्रभावाने 200 टक्क्यांनी वाढविला. • जम्मू आणि काश्मीरमधील पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर 15 फेब्रुवारी रोजी भारतने पाकिस्तानला दिलेला ‘सर्वाधिक पसंतीचे राष्ट्र’ दर्जा मागे घेतला होता. या हल्ल्यात CRPFचे 44 कर्मचार्यांचा मृत्यू झाला आणि इतर अनेक जखमी झाले. दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर जम्मू-काश्मीरमधील सुरक्षा परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली सुरक्षाविषयक कॅबिनेट समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
बैठकीनंतर पत्रकार परिषदेत अर्थमंत्री अरुण जेटली यांनी सांगितले की, हल्ला करणाऱ्या हल्लेखोरांविरुद्ध गंभीर कार्यवाही केली जाईल. केंद्रीय परराष्ट्र मंत्रालयाने या दहशतवादी हल्ल्यात साथ देणाऱ्या पाकिस्तानला अलिप्त करण्याचा सर्व प्रयत्न केला आहे.