सर्वोच्च न्यायालयाकडून ‘भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) याचे पहिले लोकपाल (Ombudsman) म्हणून निवृत्त न्यायमूर्ती डी. के. जैन यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ‘कॉफी विथ करण’ कार्यक्रमात महिलांविषयी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याप्रकरणी हार्दिक पांडय़ा आणि लोकेश राहुल यांच्याविरुद्धच्या याचिकेच्या सुनावणीत BCCIवर लोकपाल नियुक्त करावा अशी मागणी करण्यात आली होती.
भारतीय क्रिकेट नियामक मंडळासंदर्भात तक्रारींच्या निवारणाची जबाबदारी नव्या लोकपालाकडे असणार आहे. याची तामिळनाडू सोसायटी नोंदणी कायद्याच्या अंतर्गत डिसेंबर 1928 मध्ये स्थापना करण्यात आली. याचे मुख्यालय महाराष्ट्राच्या मुंबईमध्ये आहे.