अभिनेत्री करीना कपूर खान यांची ‘स्वस्थ इम्युनाईज्ड इंडिया’ मोहिमेची दूत (ambassador) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ‘स्वस्थ इम्युनाईज्ड इंडिया’ मोहिमेच्या अंतर्गत लहान मुला-मुलींच्या लसीकरणाबाबत जागरुकता पसरवून महिलांना शिक्षित केले जाणार आहे. लसी तयार करणारी जगातली सर्वात मोठी कंपनी असलेल्या ‘सीरम इंस्टिट्यूट ऑफ इंडिया (SII)’ कडून लसीकरण आणि रोगक्षमीकरण संदर्भातली ही राष्ट्रव्यापी जागृती मोहीम चालवली जात आहे.
सीरम इंस्टिट्यूट ऑफ इंडिया ही भारतातली लसींचा समावेश असलेल्या रोगप्रतिकारक औषधांचे उत्पादन घेणारी निर्माती कंपनी आहे. ही कंपनी पुनावाला समूहाकडून व्यवस्थापित केली जाते, जी पूर्णपणे सायरस पुनावाला यांच्या मालकीची आहे. 1966 साली या कंपनीची स्थापना करण्यात आली होती.