‘द नॅशनल हायस्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेड,’ ने मुंबई-अहमदाबाद, या देशातील पहिल्या बुलेट ट्रेनचे नाव आणि बोधचिन्ह सुचविण्यासाठी एका राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेचे आयोजन केले आहे. ही बुलेट ट्रेन २०२२मध्ये सुरू होईल, असे नियोजन आहे. या स्पर्धेत सहभागी होणाऱ्यांनी बुलेट ट्रेनचे नाव आणि बोधचिन्ह २५ मार्च पर्यंत सादर करावायचे आहे. बोधचिन्ह बुलेट ट्रेनचे नाव, बुलेट ट्रेनला ओळख देणारे आणि लोकांशी जोडणारे असावे , शिवाय ते योग्य पद्धतीने बनविलेले, असले पाहिजे, असेही कंपनीने म्हटले आहे. ‘Mygov.in,’ या वेवसाइटवर ही स्पर्धा होईल.
‘Mygov.in,’ या वेवसाइटवर ही स्पर्धा होईल. स्पर्धकांनी वरील वेबसाईटवर भेट देऊन अधिक माहिती घ्यावी. निवड समितीकडून नाव आणि बोधचिन्हाचे परीक्षण होईल. त्यानंतर संबंधित समिती विजयी स्पर्धकाचे नाव जाहीर करेल. विजयी स्पर्धकांना रोख बक्षिस दिले जाईल. नाव आणि बोधचिन्ह या दोन्ही विभागात प्रत्येकी पाच स्पर्धकांना प्रोत्साहनपर बक्षीस दिले जाणार आहे.