अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेची केंद्रीय कार्यसमितीची (CWC) बैठक आणि प्रांत संघटन मंत्री बैठक तसेच शैक्षणिक वर्ष 2018-19 ची समिक्षा योजना बैठक रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी, भायंदर, मुंबई येथे प्रारंभ झाली.अभाविपचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ.एस.सुबैय्या, राष्ट्रीय महामंत्री श्री आशिष चौहान आणि राष्ट्रीय संघटन मंत्री श्री सुनील आंबेकर यांच्या हस्ते या बैठकीचे उद्घाटन दीप प्रज्वलन, वंदे मातरम ने करण्यात आले.
अध्यक्षीय भाषण करण्या आगोदर राष्ट्रीय अध्यक्ष डॉ.एस.सुबैय्या यांनी सर्व प्रतिनिधींसोबत पुलवामा येथे शहिद झालेल्या सर्व शूरवीर सैनिकांना श्रद्धांजली अर्पित करण्यासाठी दोन मिनिट मौन केले. डॉ. सुबैय्या यांनी गेल्या डिसेंबर महिन्यात संपन्न झालेल्या 64व्या राष्ट्रीय अधिवेशन, कर्णावती (अहमदाबाद), गुजरात येथे झालेल्या बैठकीच्या काही मुद्द्यांवर चर्चा करताना सांगितले की, “अभाविप च्या निरंतर प्रयत्नामुळे राष्ट्रवाद, विनाशकाली माओवाद आणि मार्क्सवाद पोकळ फैशन नसून आज प्रत्येक भारतीयांच्या हृदयात आणि मनात बसलेला आहे” त्यांनी सांगितले की, अभाविपने मागील सप्टेंबर महिण्यातील सेल्फी विद कॅम्पस, मिशन साहसी सारखे रचनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करून एक सकारात्मक दृष्टी देण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच वर्तमान सरकारच्या शेतकरी सन्मान योजना सारख्या अनेक योजनांमुळे अनेक पैलूंसोबतच देशाला विकास करिता उत्तम लाभ मिळत आहे. संपूर्ण देशाला CRPF च्या सैनिकांच्या कुटुंबाचे दुःख जाणावले तसेच प्रत्येक भारतीय राष्ट्र हितासाठी योगदान देण्याकरिता तयार आहे, असे डॉ. सुबैय्या यांनी सांगितले.
राष्ट्रीय महामंत्री श्री आशिष चौहान अरुणाचल प्रदेश येथे झालेल्या दुर्भाग्यपूर्ण घटनेचे उल्लेख केले. अरुणाचल प्रदेश येथील हिंसक विरोध प्रदर्शनात युवक ची मृत्यू तसेच प्रतिकूल होत असलेल्या परिस्थितीनुसार, संघटनेचे प्रमुख प्रतिनिधी असल्यामुळे तेथील जनतेला आज विद्यार्थ्यांना लवकरात लवकर शांतता राखण्याचे आव्हान चौहान यांनी केले. कुठल्याही भुलथापाच्या बळी न पडता हिंसा भडकवणाऱ्यांपासून जागरूक राहण्याचे आग्रह चौहान यांनी अरुणाचल प्रदेश च्या युवकांना केले. संघटनात्मक दृष्टिनुसार एकूण 39 प्रांतातून आलेल्या केंद्रीय कार्यसमिती सदस्य व प्रांत संघटन मंत्री भायंदर येथील रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी परिसरात सुरु असलेल्या बैठकीत उपस्थित आहेत.