एकेदिवशी काही कामानिमित्त चर्चगेटला जाणे झाले .कामसंपेपर्यंत संध्याकाळचे सात वाजून गेले होते .ट्रेनमध्ये चढलेे खरी पण ट्रेनमध्ये तुडुंब गर्दी होती. लेडीज कंपार्टमेंट मध्ये हलायला सुद्धा जागा नव्हती आणि नेहमीप्रमाणेच माझी नजर त्या अनेक महिलांचे भावविश्व शोधण्यात हरवून गेली. दिवसभराचा कामाचा थकवा, घरी गेल्यानंतर करावा लागणारा स्वयंपाक, उद्याची कामाची तयारी हे सगळं त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होतं पण एक गोष्ट प्रकर्षाने जाणवत होती ती म्हणजे अनेकांच्या नजरा खाली आहेत………. अर्थातच त्यांच्या हातातल्या मोबाईल मध्ये..
काही दिवसांपूर्वी मी एक व्हिडिओ पाहिला . त्या व्हिडिओत असं दाखवलं होतं की मधोमध मक्याचा दाणा ठेवून चारबाजूला मोबाईल्स ठेवले होते आणि एकाच वेळेला त्या मोबाईलला कॉल केला गेला त्यामुळे येवढं रेडिएशन तिथे निर्माण झालं की त्या छोट्याशा मक्याच्या दाण्याचं पॉपकॉन मध्ये रूपांतर झालं ………..मग अंदाजे पंधरा बाय पन्नास च्या या रेल्वे कंपार्टमेंटमध्ये कित्तेक लोकं हातात मोबाईल घेऊन आहेत. कुणी WhatsApp चेक करतय , तर कुणी Facebook वर आहे , कुणी कॉल करतय, कुणी youtube वर तर अन्य सोशल नेटवर्किंग वरती…….मग त्या छोट्याशा डब्याचं रेडिएशन किती असावं? आणि जर त्या रेडिएशनची मर्यादा खूपच असली तर आपलं छोटासा जो मेंदू आहे त्याचं काय होणार? काहीजण म्हणतात “दिमाग की दही मत कर” पण मला त्यावेळी असं वाटलं की माझ्या दिमागचा पॉपकॉन नको व्हायला.
– नेहांकी संखे