पुलावामा हल्ल्यात 40 जवान शहीद झाले होते. त्याच्या 10 दिवसानंतर पंतप्रधान मोदींनी मन की बातच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला. या घटनेनंतर देशात असंतोष असल्याचे मोदींनी म्हटले. तसेच दहशतवादाविरोधात लढण्यासाठी आपण संगळ्यानी एकत्र आले पाहिजे असेही मोदींनी म्हटले. मन की बातमध्ये मोदींनी शहिदांच्या आठवणीत राष्ट्रीय स्मारक बनवण्याची घोषणा केली.
हे स्मारक म्हणजे देशासाठी बलिदान देणार्यांना देशवसीयांनी व्यक्त केलेल्या कृतज्ञतेचे प्रतीक असेल. हे स्मारक एखाद्या तीर्थस्थळासारखे असेल असे मोदींनी म्हटले. हे स्मारक चार गोष्टींवर आधारित असेल. ते म्हणजे अमर चक्र, वीर चक्र, त्यात चक्र आणि रक्षक चक्र.