नवी दिल्ली : नवीन घर घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. निर्माणाधीन घरांवरचा जीएसटी 12 टक्क्यांवरून 5 टक्क्यांवर आणलाआहे. जीएसटी परिषदेच्या बैठकीत सामान्यांनाहा मोठा दिलासा देण्यात आला आहे. शिवाय सवलतींच्या घरांवरचा जीएसटीही 8 ऐवजी 1 टक्क्यांच्या कक्षेत आणण्यात आला आहे. जीएसटी परिषदेच्या बैठकीत आज हा निर्णय घेण्यात आला आहे. हे नवे दर 1 एप्रिलपासून लागू होणार आहेत. विशेष म्हणजे ज्यांची घरखरेदी आधीच झाली आहे, त्यांच्या हफ्त्यांवरही हे नवे दर लागू होणार आहेत. मात्र कररचनेतील या नव्या बदलानंतर बिल्डरांना इनपुट टॅक्स क्रेडिटसाठी दावा दाखल करता येणार नाही.
चेन्नई, बंगळुरू, दिल्ली, हैदराबाद, कोलकाता आणि मुंबईसारख्या मेट्रो शहरांमध्ये सवलतीच्या घराची मर्यादा 60 चौरस मीटर ठेवण्यात आली आहे. तसेच लहान शहरांमध्ये 90चौरस मीटरचे घर सवलतीच्या श्रेणीमध्ये असणार आहे. ज्याची कमाल किंमत 45 लाख रुपये असेल. ही नवीन दरं एक एप्रिलपासून लागू होणार आहे. केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी याबाबत माहिती दिली आहे.