भारताच्या जसप्रीत बुमराने गेल्या काही वर्षांत उल्लेखनीय प्रगती केली असून सध्याच्या घडीला तो विश्वातील सवरेत्कृष्ट गोलंदाजांपैकी एक आहे, अशा शब्दांत ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज पॅट कमिन्सने बुमराची स्तुती केली. विशाखापट्टणम येथे झालेल्या पहिल्या ट्वेन्टी-२० क्रिकेट सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताला अखेरच्या चेंडूवर पराभूत केले. कमिन्सनेच विजयी धाव घेत ऑस्ट्रेलियाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले होते. मात्र बुमराने अप्रतिम गोलंदाजीचा नजराणा पेश करताना १९ व्या षटकात दोन फलंदाजांना बाद करत सामना भारताच्या बाजूने फिरवला होता. बुमराच्या त्या कामगिरीची कमिन्सने दिलखुलासपणे प्रशंसा केली आहे.
‘‘बुमरा नक्कीच अव्वल दर्जाचा गोलंदाज आहे. वेगवान गोलंदाजी करण्याबरोबरच चेंडूचा अचूक टप्पा राखण्याची कलाही त्याला अवगत आहे. या दोन गोष्टी ज्या गोलंदाजाकडे असतात तो कोणत्याही फलंदाजाला आव्हान देऊ शकतो. खेळाचे उत्तम ज्ञान असल्यामुळेच बुमरा त्याने आखलेल्या व्यूहरचनेची अंमलबजावणी करण्यात यशस्वी ठरत आहे,’’ असे २५ वर्षीय कमिन्स .