पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 25 फेब्रुवारी 2019 रोजी नवी दिल्ली येथे झालेल्या औपचारिक कार्यक्रमात देशाला ‘राष्ट्रीय युद्ध स्मारक’ समर्पित केले. नवी दिल्लीतील इंडिया गेटजवळ स्थित राष्ट्रीय युद्ध स्मारक हे स्वातंत्र्यानंतर राष्ट्राचे रक्षण करणाऱ्या सैनिकांना भावपूर्ण श्रद्धांजली आहे.हे स्मारक शांतता मिशन्स आणि काउंटर विद्रोह ऑपरेशन्स मध्ये सहभागी झालेल्या आणि सर्वोच्च बलिदान करणाऱ्या सैनिकांची आठवण करून देते. राष्ट्रीय युद्ध स्मारकच्या मांडणीमध्ये चार समकेंद्री वर्तुळ आहेत
1) अमर चक्र किंवा सर्कल ऑफ़ इम्मोर्टालिटी
2) वीरता चक्र किंवा बहादुरीचे मंडळ
3) त्याग चक्र किंवा बलिदान मंडळ
4) रक्षक चक्र किंवा संरक्षण मंडळ