केंद्रीय मनुष्यबळ मंत्रालयाकडून “स्किम फॉर हायर एज्युकेशन युथ इन अप्रेंटीसशीप अँड स्किल (SHREYAS / श्रेयस)” नावाची नवी योजना चालू करण्यात आली आहेत, ज्यामार्फत नव्या पदवीधारकांना संबंधित उद्योगांमध्ये प्रशिक्षण दिले जाणार आहे. मनुष्यबळ मंत्रालय, कौशल्य विकास व उद्योजकता मंत्रालय आणि कामगार व रोजगार मंत्रालय या तीन केंद्रीय मंत्रालयांच्या पुढाकारामधून चालवला जाणारा हा कार्यक्रम आहे.
पदवीधर विद्यार्थ्यांना अधिक कुशल, सक्षम बनविण्यासाठी आणि अर्थव्यवस्थेच्या गरजा पूर्ण करण्यासाठी हा कार्यक्रम तयार करण्यात आला आहे.श्रेयस पोर्टलवर शैक्षणिक संस्था आणि उद्योग लॉग-इन करू शकतात आणि त्यांच्या संबंधित मागण्या आणि प्रशिक्षणाची पूर्तता करेल.