नवी दिल्लीत पार पडलेल्या ‘राष्ट्रीय युवा संसद महोत्सव 2019’ या वार्षिक कार्यक्रमाच्या समारोपी समारंभात शेवटी ‘राष्ट्रीय युवा संसद महोत्सव पारितोषिक 2019’ या पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. श्वेता उमरे, महाराष्ट्र (प्रथम); अंजनाक्षी महेंद्रसिंग, कर्नाटक (द्वितीय); आणि ममता कुमारी, बिहार (तृतीय) यांना हे पुरस्कार मिळालेत. नवी दिल्लीत ‘नव भारताचा आवाज बना, तोडगा शोधा आणि धोरणामध्ये योगदान द्या’ (“Be The Voice of New India” and “Find solutions and contribute to policy”) या संकल्पनेखाली ‘राष्ट्रीय युवा संसद महोत्सव 2019’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
केंद्रीय युवा व क्रिडा मंत्रालयाच्या अंतर्गत राष्ट्रीय सेवा योजना (NSS) आणि नेहरु युवा केंद्र संघटना (NYKS) यांनी संयुक्तपणे या महोत्सवाचे आयोजन केले होते. विजेत्यांना पंतप्रधानांच्या हस्ते राष्ट्रीय युवा संसद महोत्सव पारितोषिक आणि प्रशस्तीपत्र प्रदान करण्यात आली. याप्रसंगी भारतीय क्रिडा प्राधिकरणाने विकसित केलेले ‘खेलो इंडिया’ या मोबाइल ॲपचेही उद्घाटन केले गेले.