कलर्सची प्रोत्साहनपर कहाणी असलेल्या केसरी नंदनमध्ये लवकरच आंतरराष्ट्रीय बॉक्सिंगपटू मेरीकोम पाहुण्या कलाकार म्हणून झळकणार आहेत. मेरी कोम केसरीच्या आयुष्यात एक मसीहा बनून अवतरणार असून त्या केसरीला तिचे कुस्तीपटू बनण्याचे स्वप्न साकार करण्याबरोबरच समाजाची पर्वा न करण्याचा सल्ला देणार आहेत.
या कार्यक्रमाविषयी मेरी कोम म्हणाल्या,’केसरी नंदन हा शो तरूण मुलींनी त्याच्या आवडीच्या खेळांत करीयर करण्यास प्रोत्साहन देणारा आहे आणि लिंगभेद न मानता खेळात चमकण्यासाठी प्रोत्साहन देणारा असा हा खेळ आहे.
केसरी सुध्दा सामाजिक दबावापुढे न झुकता शिकत आहे आणि मी या गोष्टीला नेहमीच प्रोत्साहन देत असते. मी या टिमला शुभेच्छा देते’.