अनुदानित खासगी शाळांमधील पूर्णवेळ शिक्षक व कर्मचाऱ्यांना सुधारित वेतन संरचना लागू करण्याबाबतचा सरकारचा निर्णय 22 फेब्रुवारी रोजी प्रसिद्ध झाला. त्यानुसार सरकारी कर्मचारीआणि शिक्षकांना एकाच वेळी सातव्या वेतन आयोगाचा लाभ मिळणार आहे. वेतन आयोग लागू झाल्यानंतर शिक्षकांना कधी सहा महिन्यांनी, तर कधी आठ महिन्यांनी लाभ मिळत असे. यंदा पहिल्यांदाच सरकारी कर्मचाऱ्यांबरोबरच शिक्षकांना सातवा वेतन आयोग लागू झाला आहे.
तर या आदेशामुळे राज्यातील अनुदानित खासगी प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालये, अध्यापक महाविद्यालये आणि सैनिकी शाळांतील पूर्णवेळ शिक्षक, कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगानुसार सुधारित वेतन श्रेणीचा लाभ मिळेल.