कौहर, अमेठी (उत्तरप्रदेश) येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ‘एके-47 रायफल’ निर्मितीच्या प्रकल्पाचा शुभारंभ करणार आहेत. रशियाबरोबर भागीदारीत या प्रकल्पाची सुरूवात आयुध कारखान्यात (ऑर्डिनन्स फॅक्टरी) केली जाणार असून 2010 साली त्याचे भूमीपूजन करण्यात आले होते. भारत सरकारचा याबाबत रशियाबरोबर एक करार झाला आहे. रशियाकडून संरचित ‘कलाश्नीकोव्ह’ असाल्ट रायफलचे भारतात उत्पादन घेण्यासाठी अमेठीमध्ये ‘इंडो-रशियन रायफल्स प्रायव्हेट लिमिटेड’ नावाचा संयुक्त उपक्रम तयार करण्यात आला आहे. सुमारे साडेसात लाख एके-47 नव्या स्वरूपातील एके-47 रायफलची निर्मिती येथे होणार आहे.
रशिया हा पूर्व यूरोप आणि उत्तर एशिया प्रदेशात स्थित एक विशाल आकार असलेला देश आहे. हा एकूण 17075400 चौ. किमी. क्षेत्रफळ असलेला जगातला सर्वात मोठा देश आहे. आकाराच्या दृष्टीने हा भारताच्या पाच पट आहे. या देशाची राजधानी मॉस्को शहर असून देशाचे चलन रशियन रूबल हे आहे. देशाचे वर्तमान राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन हे आहेत.