पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते स्वदेशी विकसित केलेल्या राष्ट्रीय सर्वसाधारण गतिशीलता कार्डचे (National Common Mobility Card -NCMC) अनावरण करण्यात आले आहे. हे कार्ड रूपे कार्डद्वारे समर्थित आहे. तसेच बँकद्वारे डेबिट/क्रेडिट/प्री-पेड कार्ड उत्पादनांच्या व्यासपीठावर सादर केलेले कार्ड आहे. याला ‘एक राष्ट्र एक कार्ड’ हे नाव देण्यात आले आहे.
हे कार्ड लोकांना विविध प्रकारचे वाहतूक शुल्क देण्यास सक्षमता प्रदान करते, ज्याद्वारे प्रवासादरम्यान देशभरात कुठेही कार्डधारक बसचे तिकीट, टोल, पार्किंग शुल्क, खरेदारी तसेच पैसेदेखील काढू शकणार.