केंद्रीय गृह मंत्री राजनाथ सिंग यांनी आसामच्या धुबरी जिल्ह्यात भारत-बांग्लादेश सीमेवर CIBMS (कॉम्प्रिहेन्सीव इंटीग्रेटेड बॉर्डर मॅनेजमेंट सिस्टम) कार्यक्रमाच्या अंतर्गत BOLD–QIT (बॉर्डर इलेक्ट्रॉनिकली डॉमिनेटेड QRT इंटरसेप्शन टेक्निक) प्रकल्पाचे उद्घाटन केले. सीमेवरील सुरक्षा भक्कम करण्यासाठी ही यंत्रणा तैनात करण्यात आली आहे. ही योजना सीमा सुरक्षा दलाला (BSF) ब्रह्मपुत्रा नदी आणि त्याच्या उपनद्यांच्या अविभाज्य नदीच्या परिसरात वेगवेगळ्या प्रकारच्या संवेदकांसह सीमा सुसज्ज करण्यासाठी सक्षम करते.
बांग्लादेश हा बंगालचा उपसागरालगत असलेला भारताच्या पूर्वेकडे असलेला दक्षिण आशियाई देश आहे. ढाका ही देशाची राजधानी असून चलन बांग्लादेशी टाका हे आहे. भारत बांग्लादेशासोबत 4,096 किलोमीटर लांबीची आंतरराष्ट्रीय सीमा सामायिक करते.भारत-बांग्लादेश सीमेवर BOLD–QIT प्रकल्पाचे उद्घाटन
केंद्रीय गृह मंत्री राजनाथ सिंग यांनी आसामच्या धुबरी जिल्ह्यात भारत-बांग्लादेश सीमेवर CIBMS.