नवी दिल्ली – आगामी लोकसभा निवडणुकांची घोषणा याच आठवड्यात होण्याची शक्यता आहे. या आठवड्याच्या शेवटी म्हणजेच शनिवार 9 मार्च रोजी निवडणूक आयोगाकडून निवडणुकांची घोषणा होऊ शकते. त्यामुळेच 8 मार्चपर्यंत सर्वच विकासकामांची पायाभरणी आणि उद्घाटनाची कामे पूर्ण करा, असे आदेशच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सर्वच मंत्र्यांना दिले आहेत. त्यामुळे लवकरच निवडणुकांचा बिगुल वाजणार असल्याचे समजते.
आपल्या नव्या प्रकल्पांचे पायाभरणी समारंभ 8 मार्चपर्यंत पूर्ण करावेत आणि जे प्रकल्प पूर्णत्वाच्या मार्गावर आहेत, त्यांची उद्घाटनेही 8 मार्चच्या आधी करून टाकावीत, असे आदेश पंतप्रधान कार्यालयाने (पीएमओ) सर्व मंत्रालयांना दिले आहेत. कारण, लोकसभा निवडणुकांची घोषणा 9 मार्च रोजी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे हे आदेश देण्यात आले आहेत. स्वत: पंतप्रधान मोदी 8 मार्चपर्यंत देशातील विविध केंद्रीय प्रकल्पांची उद्घाटने व पायाभरणी समारंभ करण्यात गुंतलेले असतील. त्या निमित्ताने ते सरकारी व्यासपीठावरून विरोधकांवर राजकीय टीकाही करीत आहेत. आचारसंहितेनंतर मोदींना सरकारी व्यासपीठाचा अशा कारणासाठी वापर करता येणार नाही.