शालेय विद्यार्थ्यांमध्ये संशोधन क्षेत्रात आवड निर्माण व्हावी या उद्देशाने भारतीय अंतराळ संशोधन संस्थेनी (ISRO) या वर्षापासून “युवा वैज्ञानिक कार्यक्रम” (YUva VIgyani KAryakram – युविका) नावाच्या प्रशिक्षण कार्यक्रमाचा दिनांक 4 मार्च 2019 रोजी आरंभ केला. अंतराळात शालेय विद्यार्थ्यांचे स्वारस्य जागृत करण्यासाठी अंतराळ क्षेत्राशी संबंधित तंत्रज्ञान, शास्त्र आणि अनुप्रयोगांबाबतचे मूलभूत ज्ञान देणे हा या योजनेचा मुख्य हेतू आहे. भारत सरकारच्या “जय विज्ञान, जय अनुसंधान” या दृष्टीकोनाच्या अंतर्गत तयार करण्यात आलेला हा दोन आठवडे चालणारा निवासी प्रशिक्षण कार्यक्रम आहे, ज्यामध्ये उन्हाळ्याच्या सुट्टीत विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार आहे.
दरवर्षी प्रत्येक राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातून CBSE, ICSE आणि राज्य अभ्यासक्रमांमध्ये शिकणार्या प्रत्येकी तीन विद्यार्थ्यांची निवड करण्याचे प्रस्तावित आहे. इयत्ता आठवी पूर्ण करणार्या आणि सध्या नववीत असलेल्या विद्यार्थ्यांची निवड केली जाईल.