संयुक्त राष्ट्रसंघ सुरक्षा परिषदेत (UNSC) भारताला कायमस्वरूपी (किंवा स्थायी) स्थान मिळावे यासाठी फ्रान्सचा पाठिंबा मिळाला आहे. मार्च महिन्यासाठी फ्रान्सकडे संयुक्त राष्ट्रसंघ सुरक्षा परिषदेच्या (UNSC) अध्यक्ष पदाची जबाबदारी आहे. त्यामुळे हा पाठिंबा महत्त्वपूर्ण ठरत आहे. ब्राझील, जर्मनी आणि जपान या देशांसोबतच भारत दीर्घकाळापासून संयुक्त राष्ट्रसंघ सुरक्षा परिषदेमध्ये सुधारणा घडवून आणण्याबाबत मत मांडत आहे. एप्रिल 2019 मध्ये जर्मनी परिषदेच्या अध्यक्ष पदाची जबाबदारी सांभाळणार आहे.
हे संयुक्त राष्ट्रसंघाच्या सहा प्रमुख अंगापैकी एक आहे. ही परिषद आंतरराष्ट्रीय शांती आणि सुरक्षा राखण्यास जबाबदार आहे. 1945 साली स्थापना झालेल्या या संघटनेचे आज 15 सदस्य आहेत, ज्यात अमेरिका, रशिया, चीन, ब्रिटन आणि फ्रान्स हे कायमस्वरूपी (स्थायी) सदस्य .
या कायमस्वरूपी सदस्यांकडे ‘व्हीटो’ (नकाराचा) अधिकार आहे. उर्वरित 10 तात्पुरता (अस्थायी) सदस्यांची निवड दोन वर्षांसाठी केली जाते. परिषदेच्या अध्यक्ष पदाचा कार्यकाळ एक महिन्याचा असतो.