नवी दिल्लीत भारत सरकारच्या महिला व बालविकास मंत्रालयाच्यावतीने ‘वेब वंडर विमेन’ या मोहिमेसाठीचा सत्कार समारंभ पार पडला. 30 जणांना याप्रसंगी पुरस्कृत करण्यात आले. सामाजिक माध्यमांद्वारे सकारात्मक सामाजिक बदल घडवून आणण्यात मिळविलेल्या असाधारण यशासाठी महिलांचा सन्मान करण्यासाठी हा सोहळा आयोजित करण्यात आला होता.
‘वेब वंडर विमेन’ हा मंत्रालयाच्या ‘विमेन अचीव्हर्स’ नावाच्या मोहिमेचा तिसरा घटक आहे. असामान्य क्षेत्रात प्रवेश करणार्या महिलेचा सन्मान करण्यासाठी सन 2018 मध्ये ‘फर्स्ट लेडीज’ नावाचा उपक्रम मंत्रालय राबवत आहे.