भारत सरकारने देशात स्वच्छ, जोडलेले, सामायिक आणि शाश्वत गतिशीलता पुढाकार घेण्यासाठी ‘परिवर्तनीय गतिशीलता आणि बॅटरी साठा विषयक राष्ट्रीय अभियान’ याला मंजुरी दिली आहे. 7 मार्चला केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत या अभियानाच्या अंतर्गत खालील उपक्रमांना मंजुरी दिली गेली.
गतीशीलतेसाठी स्वच्छ, संपर्कयुक्त, शाश्वत आणि सर्वसमावेशक उपक्रमांना प्रोत्साहन देण्याच्या हेतूने ‘परिवर्तनीय गतिशीलता आणि बॅटरी साठा विषयक राष्ट्रीय अभियानाला’ मंजुरी देण्यात आली.
या अभियानाच्या अंतर्गत पाच वर्षांसाठी म्हणजेच 2024 सालापर्यत बॅटरी आणि विजेवर धावणार्या वाहनांच्या सुट्या भागांसाठी टप्याटप्याने उत्पादन कार्यक्रम राबवला जाणारा असून मोठ्या, निर्यातक्षम इंटिग्रेटेड बॅटरी आणि सेल-उत्पादक गिगा प्रकल्पांच्या निर्मितीला सर्वतोपरी मदत केली जाणार.
टप्याटप्याने उत्पादन कार्यक्रम 5 वर्षे सुरु राहणार असून त्याअंतर्गत संपूर्ण विजेवर धावणारे वाहन संबंधी मूल्यसाखळीत स्थानिक उत्पादनांना प्रोत्साहन दिले जाणार आहे.
टप्याटप्याने उत्पादन कार्यक्रमाविषयक दोन योजना या राष्ट्रीय अभियानाच्या अंतर्गत निश्चित केल्या जातील.
जागतिक स्तरावर स्पर्धात्मक बहूपद्धती गतिशीलता उपायांच्या व्यवसायात भारतीय कंपन्यांना समर्थपणे उतरवण्यासाठी ह्या अभियानाच्या अंतर्गत एक सुस्पष्ट आराखडा तयार केला जाईल. या कार्यक्रमाच्या अंतर्गत देशातील इंटिग्रेटेड बॅटरी आणि सेल-उत्पादक गिगा प्रकल्पांच्या निर्मितीला चालना मिळेल. परिवर्तनीय गतिशीलतेच्या माध्यमातून नव्या भारताची निर्मिती करण्याचा आराखडाही बनवला जाईल.