जागतिक आरोग्य संघटनेनी (WHO) त्याच्या नव्या विभागाचे मुख्य शास्त्रज्ञ म्हणून सौम्या स्वामीनाथन यांची नेमणूक केली आहे. संघटनेनी ‘डिजिटल आरोग्य विभाग’ (Department of Digital Health) नावाचा नवा विभाग तयार केला आहे आणि त्यासाठी मुख्य शास्त्रज्ञ हे पद तयार केले आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने वेगाने बदलत चाललेल्या आरोग्य सेवांच्या योग्य व्यवस्थापनासाठी हा विभाग जबाबदार असणार आहे. हा विभाग डिजिटल तंत्रज्ञानाचे मूल्यांकन करण्यामध्ये आपली भूमिका वाढवेल आणि देशांना समर्थन कसे द्यावे आणि त्यांचे नियमन कसे करावे याबद्दल निर्णय घेण्यास मदत करणार आहे.
सौम्या स्वामीनाथन जागतिक आरोग्य संघटनेच्या तीन उप-महासंचालकांपैकी एक होत्या, ज्या WHO महासंचालक टेड्रोस अॅदोनोम गेब्रेयेसुस यांना मदत करत होत्या.