17 मार्च ते 19 मार्च 2019 या काळात नवी दिल्लीत भारत-आफ्रिका प्रकल्प भागीदारींच्या संदर्भातली चौदावी ‘CII-EXIM बँक परिषद’ आयोजित करण्यात आली आहे. आफ्रिका खंडातल्या 21 देशांमधून प्रतिनिधी परिषदेत सहभाग घेतील. भारतीय उद्योग परिषद आणि भारताची EXIM बँक यांच्या सहकार्याने केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्रालय या कार्यक्रमाचे आयोजन करणार आहे.
2005 साली स्थापना झाल्यापासून वार्षिक परिषदेमधून भारत आणि आफ्रिका येथील मंत्री, धोरण निर्माते, अधिकारी, व्यवसायिक, बँक, तंत्रज्ञानी, स्टार्टअप उद्योजक आणि इतर भागीदारांना एक सामान्य मंच उपलब्ध होतो. भारत-आफ्रिका आर्थिक आणि व्यवसायिक संबंधांना बळकटी आणण्यासाठी हा कार्यक्रम आखला गेला आहे. ‘दक्षिण-दक्षिण सहकार्य’ पुढाकाराच्या अंतर्गत भारत-आफ्रिका प्रकल्प भागीदारी हा कार्यक्रम चालवला जात आहे.