भारताच्या संरक्षण संशोधन व विकास संघटनेनी (DRDO) पोखरणच्या चाचणी क्षेत्रात स्वदेशी विकसित केल्या गेलेल्या मार्गदर्शित ‘पिनाका’ (PINAKA) अग्निबाणाची चाचणी यशस्वीपणे पार पाडली. 70 किलोमीटर दूरवरचे लक्ष्य भेदू शकणारे ‘पिनाका’(PINAKA) अग्निबाण मार्गदर्शित आहे.
पुण्यातले शस्त्रनिर्मिती संशोधन व विकास आस्थापना (ARDE), हैदराबाद येथील DRDOचे रिसर्च सेंटर इमारत (RCI) आणि संरक्षण संशोधन व विकास प्रयोगशाळा (DRDL) यांनी संयुक्तपणे याचा विकास केला. पिनाका मल्टी-बॅरल रॉकेट लाँचर (MBRL) मधून सोडण्यात येते. हे अग्निबाण अत्याधुनिक मार्गदर्शक आणि नियंत्रण प्रणालीने सुसज्जित आहे.