भाभा अणू संशोधन केंद्र (BARC) याच्या संचालक पदाची जबाबदारी डॉ. अजित कुमार मोहंती यांनी स्वीकारली. डॉ. मोहंती एक प्रसिद्ध वैज्ञानिक आणि भाभा अणू संशोधन केंद्राच्या भौतिक समूहाचे संचालक आहेत. त्यांच्या 36 वर्षांच्या कारकीर्दीत त्यांनी आण्विक भौतिकशास्त्राच्या विविध क्षेत्रात कार्य केले आहे.
भाभा अणू संशोधन केंद्र (BARC) या संस्थेची दिनांक 3 जानेवारी 1954 रोजी अटॉमिक एनर्जी इस्टेब्लिशमेंट, ट्रॉम्बे (AEET) या नावाने स्थापना झाली. पुढे 1966 साली भाभा यांच्या मृत्यूनंतर, दिनांक 22 जानेवारी 1967 रोजी केंद्राचे वर्तमान नावाने नामकरण करण्यात आले. ही भारतातली प्रमुख अणू संशोधन विषयक सुविधा आहे. त्याचे मुख्यालय मुंबई (महाराष्ट्र) येथे आहे. डॉ. होमी जे. भाभा त्याचे संस्थापक मानले जातात. भारताचे पहिले-वहिले पॉवर रिएक्टर ‘तारापूर अणू वीज केंद्र’ येथे अमेरिकेच्या मदतीने स्थापन करण्यात आले.