भारताचे माजी संरक्षण मंत्री आणि गोवा राज्याचे मुख्यमंत्री श्री मनोहर पर्रिकर यांचे आज दीर्घ आजराने दुःखद निधन झाले. गेले वर्षभर ते स्वादुपिंडीच्या कर्करोगाशी लढा देत होते. मनोहर पर्रिकर यांच्या निधनाने केवळ गोवाच नव्हे तर संपूर्ण भारत शोक व्यक्त करत आहे. गोव्याच्या राजकीय तसेच सामाजिक जीवनावर त्यांचा मोठा प्रभाव आहे. त्यांच्या संरक्षण मंत्रिपदाच्या कार्यकाळात झालेल्या ‘सर्जिकल स्ट्राइक’ मुळे जगाला सशक्त भारताचे दर्शन घडले. २०१५ चे अभाविप महाराष्ट्र प्रदेश अधिवेशन तसेच २०१६ इंदौर येथे झालेल्या राष्ट्रीय अधिवेशनात प्रमुख पाहुणे म्हणून ते लाभले होते.
या दुःखद प्रसंगी अभाविप त्यांच्या कुटुंबाचे तसेच गोमंतकीय जनतेचे सांत्वन करते.
गोवा राज्यातील अभाविपच्या अनेक शैक्षणिक सूचनांना त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याची, तसेच आजारी असतानाही त्यांनी अभाविप शिष्टमंडला त्यांनी आवर्जून भेट दिल्याचे प्रदेश मंत्री अनिकेत ओव्हाळ यांनी यावेळी यावेळी सांगितले. त्यांच्या निधनाने देश एका राष्ट्रभक्त, साध्या पण खंबीर नेत्याला मुकला असल्याचे मत अभाविप कोंकण प्रदेश मंत्री अनिकेत ओव्हाळ यांनी व्यक्त केले आहे.