देशात २०१७-१८ मध्ये कुपोषणाचे प्रमाण २ टक्क्य़ांनी घटले असल्याचा दावा करण्यात आलाअसून कुपोषणाचे प्रमाण वार्षिक ३४.७ टक्के आहे. यात विशेष करून वयपरत्वे मुलांची वाढ खुंटण्याचे प्रमाण कमी झाल्याचे सरकारी अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
राष्ट्रीय आरोग्य पाहणी सर्वेक्षणात असे दिसून आले,की भारतात मुलांची वाढ खुंटण्याचे प्रमण २०१७-१८ मध्ये ३४.७ टक्के नोंदले गेले असून ते २०१५-१६ मध्ये ३८.४ टक्के होते. वाढ खुंटणे हा प्रकार कुपोषणामुळे होत असतो. बराच काळ पोषक आहार नमिळणे किंवा रोगजंतूंचा संसर्ग असणे यामुळेमुलांची उंची वाढत नाही. युनिसेफ व आरोग्य मंत्रालय यांनी केलेल्या पाहणीनुसार २०१५-१६ व २०१७-१८ या काळात वाढ खुंटण्याचे प्रमाण ४ टक्क्य़ांनी कमी झाले आहे. म्हणजे ही घट वार्षिक दोन टक्के आहे.
हा पाहणी अहवाल १.१२ लाख घरांची माहिती घेऊनतयार केला आहे. पोषण अभियानामुळे कुपोषण दोनटक्क्य़ांनी कमी झाल्याचा दावा करण्यात आला आहे. पोषण अभियान ही पंतप्रधान नरेंद्र मोदीयांनी मार्च २०१८ मध्ये राबवलेली योजना असून त्यात मुलांची वाढ खुंटण्याचे प्रमाण २०१५-१६ मधील ३८.४ टक्क्य़ांवरून ते २०२२ पर्यंत २५ टक्क्य़ांपर्यंत खाली आणण्याचे उद्दिष्ट आहे.
महिलांमधील अॅनिमिया (रक्ताची कमतरता) २०१७-१८ मध्ये ४० टक्के नोंदला गेला, २०१५-१६मध्ये ५०-६० टक्के होता. ग्लोबल न्यूट्रिशन रिपोर्टमध्ये म्हटल्यानुसार भारतात कुपोषणाची समस्या गंभीर असून जगातील वाढ खुंटलेल्या लोकांमध्ये एक तृतीयांश भारतीय आहेत. वाढ खुंटलेल्या मुलांची संख्या भारतात सर्वाधिक ४६.६ दशलक्ष आहे. त्यानंतर नायजेरिया (१३.९ दशलक्ष), पाकिस्तान (१०.७ दशलक्ष) यांचा समावेश आहे.