ATM मधून कार्डच्या वापराशिवाय ग्राहकांना ‘योनो’ मोबाईल अॅपद्वारे पैसे काढता यावे त्यासाठी भारतीय स्टेट बँकनी (SBI) ‘योनो कॅश पॉइंट’ सेवा सुरू केली आहे. SBIच्या तब्बल 16500 ATMमध्ये योनो कॅशसेवेव्दारे पैसे काढणे शक्य होणार आहे. ही सुविधा उपलब्ध करून देणारी SBI ही देशातली पहिली बँक ठरली आहे.
85 ई-वाणिज्य कंपन्यांकडून कस्टमाईज्ड उत्पादने व सेवा देणारी ही पहिलीच सर्वंकष डिजीटल बँकींग सुविधा आहे. ही UPI (युनिफाइड पेमेंट इंटरफेस) पेमेंट सेवेच्या माध्यमातून व QR कोडच्या (क्विक रीस्पॉन्स कोड) सहाय्याने ATM मधून पैसे काढण्याची सुविधा आहे.