होळी म्हणजे आनंदाचा आणि उत्साहाचा सण महाराष्ट्रात तर पुरणपोळी आणि रंगांची उधळण ठरलेली असते. नैवेद्य म्हणुन होळीला अर्पण करण्यात येणारी पुरणपोळी आम्हांला द्या ती आम्हीं वंचितांच्या तोंडी देवु यामुळे पुरणपोळी वाया जाणार नाही आणि सणांचा आनंद अधिक वाढेल असे आवाहन टीम परिवर्तनच्या माध्यमाने करण्यात आले आणि मुंबईकरांचा त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या उपक्रमात ३०० पेक्षा अधिक पोळ्या जमा झाल्या. ब्रदर्स स्पोर्ट्स क्लब, माणिक अपार्टमेंट, सिद्धिविनायक अपार्टमेंट आणि सारंग बिल्डिंग लोअर परळ येथील नागरिकांनी उपक्रमात मोठे योगदान दिले त्याचबरोबर प्रतिक्षा नगर सायन येथील रहिवाशांनी या अनोख्या पोळी दान देण्याच्या उपक्रमास विशेष सहकार्य केले. जमा झालेल्या सर्व पुरणपोळ्या दादर रेल्वे स्टेशन आणि केईम हॉस्पिटल परिसरातील लहान मुलांना देण्यात आल्या.
उपक्रमात टीम परिवर्तनचे भक्ती कुंभार, प्रतीक्षा उमरसकर, अनुजा दळवी, जान्हवी कांबळे, विधी गोलटकर, लेसली डिसुझा, प्रणिल मिसळ सहभागी झाले होते. पुरणपोळी बनवण्यामागे अनेकांचे कष्ट असतात या कष्टांना होळीत टाकण्यापेक्षा गरजु आणि उपाशीपोटी झोपणाऱ्या लोकांना देणे हाच आपला खरा सण आहे यांसाठी आम्हीं हा उपक्रम राबविला असे तुषार वारंग यांनी यावेळीं सांगितले.