युट्युबने भारतात नुकताच Youtube Music, Youtube Music Premium आणि Youtube Premium लाँच केले आहे. विशेष म्हणजे यूट्यूब प्रीमियमससाठी कोणतेही नवीन अॅप डाऊनलोड करायची गरज नाही.
या लाँचनंतर भारतामध्ये स्ट्रिमिंग स्पेसमध्ये आणखी एक मोठे नाव जोडले गेले आहे.
Youtube Music म्हणजे गाण्यांचा खजाना आहे. सर्व गाणी एकाच ठिकाणी उपबलब्ध असणार आहेत. मुळ गाण्यासोबत रीमिक्स, लाइव परफॉर्मेंसचे कव्हरेज, कव्हर साँग आणि म्युझिक व्हिडियोही असणार आहे.
युट्युबवर तुम्हाला कॅटलॉग मिळेल. त्यामध्ये कंपनी दोन प्रकारची सर्व्हिस देत आहे. यामध्ये एक फ्री Youtube Music आणि दुसरे Youtube Music Premium आहे. गतवर्षी जूनमध्ये अमेरिकेसह 17 देशात युट्युबने ही सर्व्हिस सुरू केली होती.