संयुक्त राष्ट्रसंघाकडून ‘जागतिक आनंद अहवाल 2019’ प्रसिद्ध करण्यात आला आहे. सर्वेक्षणात असे दिसून आले आहे की, देशाचे उच्च सकल स्थानिक उत्पन्न (GDP) असले तरी आणि दरडोई उत्पन्न जास्त असले तरीही ते सर्वाधिक आनंदी देश नाहीत. लोकांचा आनंदीपणा देशातले कायदे आणि नियमांशी निगडीत आहे.
सलग दुसर्यांदा फिनलँड हा जगातला सर्वाधिक आनंदी देश घोषित करण्यात आला आहे.
गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी भारत सात स्थानांनी खाली घसरत 140 व्या क्रमांकावर आहे.
सुदान देशाचे लोक त्यांच्या जीवनमानाशी नाखुश आहेत.
या जागतिक सर्वेक्षणात 156 देशांच्या नागरिकांना सामील करण्यात आले होते. हे सर्वेक्षण संयुक्त राष्ट्रसंघाच्या सस्टेनेबल डेव्हलपमेंट सोल्यूशन्स नेटवर्कद्वारे केले गेले. 14 परिमाणांच्या आधारावर हे सर्वेक्षण केले गेले, ज्यात व्यवसाय व आर्थिक, नागरी प्रतिबद्धता, संपर्क आणि तंत्रज्ञान, विविधता (सामाजिक), शिक्षण व कुटुंब, भावना (कल्याण), पर्यावरण व ऊर्जा, अन्न व निवारा, सरकार व राजकारण, कायदा व सुव्यवस्था (सुरक्षा), आरोग्य, धर्म व नैतिकता, परिवहन आणि कार्य यांचा समावेश आहे.