संयुक्त राज्ये अमेरिकेच्या गणितज्ञ आणि शिक्षीका कॅरेन उलेनबेक यांना 2019 सालाचा गणित विषयातला प्रतिष्ठित एबल पारितोषिक जाहीर झाला आहे. हा सन्मान प्राप्त करणारी ती प्रथम स्त्री आहे. आंशिक विभेद (Partial Differential) समीकरणाच्या बाबतीत केलेल्या कामासाठी कॅरेन उलेनबेक यांना हा पुरस्कार दिला गेला. जियोमॅट्रिक अनॅलिसिस आणि गेज सिद्धांत या विषयात 40 वर्षापासून त्या काम करीत आहेत.
त्यांनी मांडलेल्या सिद्धांतांनी साबणामुळे तयार होणार्या बुडबुड्यांच्या पृष्ठभागाप्रमाणे असलेल्या किमान पृष्ठभागाला समजून घेण्यासाठी तसेच उच्च आयामांमध्ये अधिक जनरल मिनिमायझेशन समस्यांविषयी आपली समज वाढविण्यासाठी क्रांती केली.
नॉर्वेच्या अकॅडेमी ऑफ सायन्स अँड लेटर या संस्थेकडून गणित विषयातला प्रतिष्ठित एबल पारितोषिक दिला जातो. 2003 सालापासून हा पुरस्कार दरवर्षी दिला.