ललित कला अकादमीच्या 60 व्या राष्ट्रीय अकादमी पुरस्कारांसाठी देशातील 15 कलावंतांची निवड करण्यात आली. 25 मार्चला एका सोहळ्यात या पुरस्कारांचे वितरण मुंबईत केले गेले. यानिमित्ताने 25 मार्च ते 8 एप्रिल या काळात 60 वी राष्ट्रीय कला प्रदर्शनी देखील भरविण्यात आली.
महाराष्ट्रातले जितेंद्र सुरेश सुतार, डगलस मरियन जॉन, सचिन काशीनाथ चौधरी, वासुदेव तारनाथ कामथ ह्यांना यंदा पुरस्कार दिला गेला आहे.
चंदन कुमार समाल (ओडिशा), गौरी वेमुला (तेलंगणा), हेमंत राव (मध्यप्रदेश), हिरण कुमार छोटू भाई पटेल (गुजरात), जया जेना (ओडिशा), जयेश के. के. (केरळ), प्रताप चंद्र चक्रवर्ती (पश्चिम बंगाल), रश्मी सिंग (उत्तरप्रदेश), सुनील कुमार विश्वकर्मा (उत्तरप्रदेश), तबस्सूम खान (बिहार) आणि विनीता सद्गुरु चेंदवणकर (गोवा)