नदीच्या पृष्ठभागावर वीज निर्मिती करण्याचा भारतीय तंत्रज्ञान संस्था (IIT) रुडकीचा प्रयोग यशस्वी झाला आहे. संशोधकांनी वाहत्या पाण्यावर तरंगणारे एक असे उपकरण तयार केले आहे, जे प्रवाहाच्या शक्तीचा वापर करून वीज निर्मिती करते. हा अक्षय ऊर्जेसाठी एक पर्यायी स्रोत ठरत आहे. या उपकरणासाठी ‘हायड्रो-कायनेटिक’ तंत्रज्ञानाचा वापर केला गेला आहे.
पाण्याचा प्रवाह वाहत्या वार्यापेक्षा शंभर पटीने अधिक ऊर्जा उत्पन्न करू शकते, असे संशोधनात आढळून आले आहे. पारंपारिक जलविद्युत प्रकल्पांसाठी मोठ्या प्रमाणावर धरणाची बांधणी करावी लागते, ज्याचा पर्यावरणावर विपरीत परिणाम होतो. या समस्येला एक पर्याय म्हणून नवे तंत्र विकसित करण्यावर भर दिला जात आहे.