लोणावळा येथे भारतीय नौदलाच्या ‘INS शिवाजी’ या जहाजावर उभारलेल्या ‘अणू, जैविक आणि रासायनिक प्रशिक्षण सुविधा’ (NBCTF) याचे उद्घाटन केले गेले. याप्रसंगी, नौदलाने ‘अभेद्य’ कार्यक्रमाचा आरंभ केला. या कार्यक्रमामधून जहाजावरील कर्मचार्यांना अणू, जैविक व रासायनिक पदार्थांचा शोध व संरक्षण प्रणालीविषयी प्रशिक्षण दिले जाईल. 2019-20 हे ‘INS शिवाजी’ जहाजाचे प्लॅटिनम ज्युब्ली वर्ष आहे. त्यानिमित्ताने “प्रोपेलिंग द इंडियन नेव्ही सीन्स 1945” या विषयाखाली एक बोधचिन्ह (logo) प्रसिद्ध करण्यात आले.
भारतीय नौदलाच्या स्थापनेची सुरूवात 1934 साली ब्रिटीशांनी स्थापलेल्या ‘रॉयल इंडियन नेव्ही’ या दलापासून झाली. 1971 सालाच्या भारत-पाकिस्तान युद्धामधील नौदलाच्या कामगिरीला स्मरणात ठेवत दरवर्षी 4 डिसेंबर हा दिवस ‘नौदल दिन’ म्हणून साजरा करण्यात येतो.
भारतीय नौदल हे जगातले पाचव्या क्रमांकाचे नौदल आहे. भारतीय नौदल हे जगातले पाचव्या क्रमांकाचे नौदल आहे. भारतीय नौदलात स्वदेशी बनावटीची ‘INS अरिहंत’ ही पहिली अणू पाणबुडी सामील करण्यात आली.