राष्ट्रपती राम नाथ कोविंद ह्यांनी क्रोएशिया या देशाला भेट दिली. ते क्रोएशिया, बोलिव्हिया आणि चिली या तीन युरोपीय देशांच्या दौऱ्यावर आहेत. या भेटीदरम्यान क्रोएशियाचे राष्ट्राध्यक्ष कोलिंदा ग्रबर-कित्रोव्हिक ह्यांनी राष्ट्रपती राम नाथ कोविंद ह्यांना क्रोएशियाचा ‘ग्रँड ऑर्डर ऑफ द किंग ऑफ टॉमस्लाव्ह’ हा सर्वोच्च नागरी सन्मान देऊन सन्मानित केले.
याशिवाय, संस्कृती, पर्यटन, क्रिडा या क्षेत्रांमध्ये तसेच संस्कृत आणि हिंदी या भाषेसाठी जागा तयार करण्यासाठी भारताने क्रोएशियासोबत चार सामंजस्य करार केले.
हा पूर्व युरोपीय देश आहे, ज्याला एड्रियाटिक समुद्राची दीर्घ किनारपट्टी लाभलेली आहे.
झगरेब ही देशाची राजधानी आहे आणि क्रोएशियाई कुना हे राष्ट्रीय चलन आहे.