अखिल भारतीय शारीरिक औषधे व पुनर्वसन संस्था (AIIPMR) 1 एप्रिल ते 15 एप्रिल या काळात ‘स्वच्छता पंधरवाडा’ पाळणार आहे. या काळात शरीराच्या स्वच्छतेसंबंधी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार आहे, ज्यात परिसंवाद, स्पर्धा आणि कचर्यापासून खत निर्मिती अश्या कार्यक्रमांचा समावेश आहे.
1955 साली स्थापना करण्यात आलेली अखिल भारतीय शारीरिक औषधे व पुनर्वसन संस्था (All India Institute of Physical Medicine and Rehabilitation – AIIPMR) हे भारत सरकारच्या आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या अंतर्गत कार्य करणारी शारीरिक वैद्यकीय पुनर्वसन क्षेत्रातली सर्वोच्च संस्था आहे. ही संस्था पुनर्वसन क्षेत्रात सेवा, प्रशिक्षण देण्यासाठी आणि संशोधन करण्यासाठी समर्पित आहे. संस्थेचे मुख्यालय मुंबई (महाराष्ट्र) येथे आहे.