नाइट फ्रँक या संस्थेच्या जागतिक अहवालानुसार, मुंबई हे सर्वाधिक वार्षिक कौटुंबिक उत्पन्नवाढ साधणाऱ्या शहरांच्या जागतिक सूचीत तिसरे ठरले आहे. सॅन फ्रान्सिस्को आणि मॉस्को नंतर मुंबईचा नंबर लागला आहे.
2014 ते 2018 या कालावधीत मुंबई शहराला कौटुंबिक उत्पन्नामध्ये वार्षिक 20.4 टक्के वाढ साधण्यात यश मिळाले आहे. याच कालावधीत मुंबईतील घरांच्या किमती मात्र केवळ 8 टक्क्यांनी वाढल्या.
सॅन फ्रान्सिस्को शहराला वार्षिक 25.6 टक्के एवढी सर्वाधिक उत्पन्नवाढ साधण्यात यश मिळाले, तर मॉस्को शहराला 22.7 टक्के एवढी उत्पन्नवाढ साधण्यात यश मिळाले. ॲमस्टरडॅम शहरातील घरांच्या किमती सर्वाधिक जास्त म्हणजेच तब्बल 63.6 टक्क्यांनी वाढल्या.