केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्रालयाकडून भारतात उत्पन्न घेतल्या जाणार्या कॉफीसाठी ब्लॉकचेन तंत्रज्ञानावर आधारित असलेल्या इलेक्ट्रॉनिक्स बाजारपेठेचा शुभारंभ करण्यात आला आहे.
भारतीय कॉफीच्या व्यापारासाठी त्यासंबंधी अॅप व्यापारात पारदर्शकता आणण्याच्या उद्देशाने तयार करण्यात आले आहे. हा प्रायोगिक प्रकल्प शेतकर्यांना बाजारपेठेशी जोडण्यासाठी राबवविला जात आहे आणि त्यामुळे कॉफी उत्पादकांना वाजवी किंमतीविषयी जाणीव होईल. हे उत्पादन व पुरवठा शृंखलेत कॉफी उत्पादक आणि खरेदीदार यांच्यातल्या स्तरांची संख्या देखील कमी करेल आणि शेतकर्यांची मिळकत दुप्पट करण्यास मदत करेल.
ब्लॉकचेन तंत्रज्ञानावर आधारित असलेली इलेक्ट्रॉनिक्स बाजारपेठ विकसित करण्यासाठी कृषीविषयक डिजिटल शेतमाल व्यवस्थापन व्यासपीठाच्या संदर्भातली बेंगळुरू येथील ‘एका प्लस’ ही जागतिक कंपनी कॉफी बोर्डशी सहकार्य करीत आहे.