जागतिक आरोग्य दिवसाचे औचित्य साधत टीम परिवर्तन, कुटुंब सेवा फाउंडेशन आणि शिवाजीनगर सार्वजनिक वृत्तपत्र वाचनालय केंद्राने शिवाजी नगर नेपेंसी रोड येथे मोफत नेत्रचिकित्सा शिबिराचे आयोजन केले होते. आपल्या आयुष्यात डोळ्यांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे त्यांची निगा राखणे काळजी घेणे आणि वेळोवेळी तपासणी करणे प्रत्येकासाठी आवश्यक आहे यांसाठी ह्या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
कुटुंब सेवा फाउंडेशनचे डॉ. हर्ष खंडागळे शिवाजी नगर सार्वजनिक वृत्तपत्र वाचनालय केंद्राचे वसंत थापा, सुनिल कोकरे आणि भावेश ठुले यावेळीं उपस्थित होते. शिवाजीनगर परिसरातील ५० पेक्षा अधिक नागरिकांची मोफत यावेळीं तपासणी करण्यात आली शिवाय ३ लोकांना पुढील शस्त्रक्रिया करण्यासाठी मार्गदर्शन देखील यावेळीं करण्यात आले. आरोग्याच्या विविध प्रश्नांवर आम्हीं वेळोवेळी उपक्रम आणि जनजागृती कार्यक्रम करणार आहोत असे टीम परिवर्तनचे तुषार वारंग यांनी यावेळीं सांगितले.