प्रथमतः मी भारतीय, भारताचे संविधान हेच माझे ग्रंथ, लोकशाही हीच माझी आत्मा, आपण भारताचे संविधान व त्याची उददेशिका वाचलेच असणार पहिलच वाक्य आहे आम्ही भारताचे लोक नंतर त्यात काही मुलभूत गोष्टींचा उल्लेख केला आहे….. सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही, गणराज्य… भारताच्या सर्व नागरिकांस सामाजिक, आर्थिक, राजनैतिक, न्याय विचारांची अभिव्यक्ति, विश्वास, श्रद्धा, उपासना तसेच आपली प्रतिष्ठा, राष्ट्राची एकता, यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवरधीत करण्याचे संकल्प आपण घेतलेले आहे परंतू ती परिस्थिती आज आहे का ? स्वातंत्र्य आम्हाला आहे का ?बरोबरच दर्जा व समानतेची संधी उपलब्ध आहे का ? जेव्हा आम्हाला मतदानाचा अधिकार आहे आणि आम्हाला आपल्या भविष्यासाठी, समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी, लोकशाही बळकट करण्यासाठी, संविधानिक हक्क मिळवून देण्यासाठी, आम्ही खासदार, आमदार निवडून आमचे प्रतिनिधित्व करण्यासाठी संसदेत व विधीमंडळात पाठवण्याचे काम आम्ही मतदार राजा म्हणून करत असतो.
आपणास आठवत असेल जेव्हा आम्ही शालेय शिक्षण घेत होतो तेव्हा प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने व स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आम्ही प्रभात फेरी काढायचो आणि घोषणा द्यायचो भारत माँ के चार शिपाई, हिंदू मुस्लिम शिख ईसाई नंतर भारत मात की जय, वंदे मातरम् आणि मग आम्ही वर्षभर कधीच या घोषणांचा उहापोह करायचो नाही, परंतू आज हा राष्ट्रवाद बनाम देशद्रोह हे आणलं कोणी ?
उच्च शिक्षण घेऊन बाहेर पडल्यावर आम्हाला कळाले की या देशात हजारो जाती आणि धर्म वास्तव्यास आहेत. आपलं वय १८ वर्ष झाले की मतदानाचं हक्क बजावता येतो म्हणजे आम्ही एक दिवसासाठी मतदार राजा बणतो मग खरे जात, धर्म, समाजकारण, राजकारण, राष्ट्र, नानाप्रकारचे अभ्यास लोकशाहीच्या चौथ्या स्तंभ असलेल्या मिडीया च्या माध्यमातून कळते….परंतू आम्ही मुलभूत हक्क व सुविधा याचं केलेलं अभ्यास या राजकारणाच्या वातावरणात विसरून जातो…. घराचा प्रतिनिधित्व करणारे आमचे बाबा (वडील) नेहमीच घरातल्या प्रत्येक व्यक्तीचा मुलभूत गरजा पूर्ण करताना आम्ही सर्वांना याचा अनुभव आहेतच…. त्याचाच आधार म्हणून जेव्हा आम्ही आपल्यासाठी,समाजासाठी,राष्ट्रासाठी, शोषित, वंचितासाठी धोरण बनविण्यासाठी आमचे प्रतिनिधित्व करण्यासाठी मतदानाचा हक्क बजावतो तेव्हा आम्ही *मतदार राजा* म्हणून ओळखले जातो, परंतू जेव्हा धोरणात्मक ठोस निर्णय घेण्याची वेळ संसदेत येते तेव्हा ते आपल्या बाजूने आहेत का याची माहिती कुठलाच खासदार किंवा आमदार हा मतदार राजाला देत नाही. आणि आम्ही मतदार राजा समजणारे देखील कधीच यावर प्रश्न उपस्थित करत नसतो, काही दिवसांपूर्वी बातमी आली की भारत हा युवकांचा देश आहे, आणि आज आपण प्रसार माध्यमांतून बघत आहोत की भारतात ४५ वर्षात सर्वात जास्त बेरोजगारी या पाच वर्षांत वाढली अशी बातमी येते, एकीकडे महिलांना सुरक्षा व्यवस्था निर्माण करण्यासाठी शासनाने मोठ्या प्रमाणात पावले उचलली आहे असं असताना दुसरीकडे प्रसार माध्यमातून बलात्कार सारख्या घटना वाढतच आहे, एकीकडे शेतकर्यांच्या मनोबल वाढले पाहिजे यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या योजना राजकीय स्तरावर घेतले जात असतानाच शेतकरी आत्महत्या कितीतरी पटीने अधिक वाढली असल्याची बातमी आम्ही वाचत आहोत.
प्रत्येक वेळी आपणांस सांगण्यात येतं की राजकारण हे चांगल्या माणसाचं काम नाही याचा अर्थ असा आहे की राजकीय सत्तेत गोरगरीब हुशार शिकलेला, शिक्षित यांनी राजकारणात पडू नये मग देशाचा विकासासाठी, गरीबांना न्याय मिळवण्यासाठी जी धोरण बणताता येथे पुजारी, बाबा, अशिक्षित अशा लोकांनी गेले पाहिजे का? याला जबाबदार कोण ? तर राजकीय पक्ष व मतदार राजा, देशात राजकीय पक्ष कसे असावे, देशहितासाठी, राष्ट्रहितासाठी, समाजहितासाठी, महिलांच्या हितासाठी, गोरगरीब जनतेसाठी, सत्तेत असणारे व विरोधी पक्षात असणारे ही, परंतू आपण बघतोय की गेल्या १५ ते २० वर्षापासून या राजकीय पक्षांना शोषित वंचित, गोरगरीब यांची काहीच पडलेली नाही……. !
आता एक दिवसाचा हा मतदार राजा जागृत होईल का ?
भास्कर ना. राठोड