मुंबई | न्या. प्रदीप नांदराजोग यांनी रविवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशपदाची शपथ घेतली. न्या. प्रदीप नांदराजोग राज्याचे ४३ वे मुख्य न्यायाधीश आहेत. राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी न्या. प्रदिप नांदराजोग यांना न्यायाधीश पदांची शपथ दिली.
त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, त्यांचे अन्य सहकारी मंत्री, उच्च न्यायालयाचे न्यायाधीश व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. आधीचे मुख्य न्यायाधीश न्या. नरेश पाटील निवृत्त झाल्याने. त्यांच्या जागी न्या. प्रदिप नांदराजोग यांची नेमणूक झाली.