अखिल भारतीय फुटबॉल महासंघाचे अध्यक्ष प्रफुल पटेल यांची ‘FIFA कार्यकारी परिषद’ याचे सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे. प्रफुल पटेल या मंडळात सामील करण्यात आलेले पहिले भारतीय ठरले आहेत. सन 2019 ते सन 2023 या काळात ते या पदावर राहतील.
आंतरराष्ट्रीय फुटबॉल महासंघ (International Federation of Football Association -FIFA) हा एक खासगी महासंघ आहे, जो स्वतःस असोसिएशन फुटबॉल, फुटसल आणि बीच सॉकर या क्रिडाप्रकारांची एक आंतरराष्ट्रीय प्रशासकीय संस्था म्हणून संबोधतो.
FIFA फुटबॉल या क्रिडाप्रकाराच्या प्रमुख आंतरराष्ट्रीय स्पर्धांच्या, विशेषत: पुरुष विश्वचषक (1930 सालापासून) आणि महिला विश्वचषक (1991 सालापासून), आयोजनासाठी जबाबदार आहे. 1904 साली FIFAची स्थापना करण्यात आली आणि त्याचे मुख्यालय झुरिच (स्वित्झर्लंड) येथे आहे. त्याच्या सदस्यत्वामध्ये सध्या 211 राष्ट्रीय संघांचा समावेश आहे.